“त्या” उपोषण करणाऱ्या कामगारांची आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट

थकीत पगार मिळवून देण्याची हमी देत १६ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत तोडगा काढण्याचे दिले आश्वासन

सिंधुदुर्गनगरी ता १४ फोंडा घाट येथील चिराग सेन्टेन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी ११ महीने पगार न मिळाल्याने १२ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आमदार नितेश राणे यांनी भेट देत कामगारांच्या थकीत राहिलेला पगार मिळवून देण्याची हमी त्यांना दिली .तर याबाबत १६ जानेवारीला संबंधितांची बैठक घेऊन यावर निश्चित तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे. फोंडा घाट येथील चिराग माईन्स कंपनीच्या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ महिन्याचा थकीत असलेल्या पगार तात्काळ मिळावा. या मागणीसाठी १२ जानेवारीपासून गेले तीन दिवस आमरण उपोषण सुरू ठेवले आहे. मात्र संबंधित कंपनीकडून पगार देण्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तर चर्चेसाठीही कोणी आलेले नाही. याबाबत आज कणकवली देवगड विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आपला ११ महिन्याचा पगार थकित राहिला आहे .तो मिळवून देण्यासाठी संबंधित चिराग माईन्स कंपनीच्या व्यवस्थापनाशी व आपल्या प्रतिनिधीची एकत्रित चर्चा करून याबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल. त्यासाठी मी मध्यस्थी करायला तयार आहे. माझ्या मतदारसंघातील कामगारासाठी योग्य तो सकारात्मक तोडगा काढून आपला थकीत राहिलेला पगार मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो. असे आश्वासन दिले. तसेच यासाठी १६ जानेवारी रोजी चर्चेसाठी एकत्र या .असे सांगितले आहे. चिराग माईन्स कंपनीच्या कामगारांनी आमदार नितेश राणे यांच्या आश्वासनानुसार चर्चेसाठी सहमती दर्शविली आहे तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आजच्या तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच असल्याने उपोषण करत या कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली आहे याबाबत गंभीर दखल घेत आमदार नितेश राणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांच्याशी फोनवर संपर्क करून तीन दिवस कामगारांचे उपोषण सुरू आहे त्यातील काही कामगारांची तब्येत अत्यंत खालावलेली असताना अद्याप त्यांचे आरोग्य तपासणी का झाली नाही असा प्रश्न उपस्थित करत जाब विचारला तर तात्काळ डॉक्टर पाठवून सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करा अशी सूचना केली त्यानंतर लगेच जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषण करत्या कामगारांची आरोग्य तपासणी सुरू केली मात्र गेले दोन दिवस आरोग्य प्रशासनाकडून उपोषण कर्त्यांच्या आरोग्याबाबत दखल घेतली गेली नाही याबाबत नाराजी व्यक्त केली यावेळी त्यांच्या सोबत फ़ोडा सरपंच संतोष आग्रे उपस्थित होते.

You cannot copy content of this page