मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने हंटर विमान परिसराची स्वच्छता

सिंधूदुर्गनगरी ता १३ १९७१ च्या भारत-पाक युद्धात ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर मागील काही वर्षे सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुलाच्या परिसरात दिमाखात उभ्या असलेल्या हंटर विमान परिसराची मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने बुधवारी स्वच्छता करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यानी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. अनेक पर्यटक हे विमान पाहण्यासाठी येतात. तसेच शालेय विद्यार्थांच्या सहलीही या ठिकाणी येतात. मात्र, हंटर विमानाची दुर्दशा झाली आहे. पावसात परिसरात रुजलेले गवत सुकल्याने दुर्दशेमध्ये अधिक भर पडली होती. त्यामुळे येथील स्वच्छ्ता करण्याचे नियोजन मुख्यालय पत्रकार संघाने केले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी मुख्यालय पत्रकार संघाने स्वच्छ्ता मोहिम राबविली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा सदस्य बाळ खडपकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, उपाध्यक्ष नंदकुमार आयरे, सचिव संजय वालावलकर, लवू म्हाडेश्र्वर, दत्तप्रसाद वालावलकर, विनोद दळवी, विनोद परब, गिरीश परब, मनोज वारंग, सतीश हरमलकर, प्रसाद पाताडे, अमोल तांबे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सफाई कामगार संतोष हुले, यशस्वीता बागवे , उज्वला निकम, उज्वला धुरी, राजश्री कदम, स्वाती कांबळे आदी सहभागी झाले होते. मुख्यालय पत्रकार संघाकडून दरवर्षी अनेक उपक्रम राबविले जातात. कोरोना कालावधीत प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेला हा परिसर . झाडी झुडपे वाढल्याने व शेवाळ सुकल्याने काहीसा अस्वच्छ झाला होता. हंटर विमान ठेवल्याने ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालेला हा परिसर स्वच्छ करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी यानी घेतली दखल मुख्यालय पत्रकार संघाने राबविलेल्या स्वच्छ्ता मोहिम ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यानी भेट दिल्यानंतर या विमानाचे महत्व व सिंधूदुर्गनगरी येथे हंटर विमान ठेवण्यामागचा उद्देश जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी झालेल्या दुर्लक्षाबाबत तात्काळ दखल घेत सिंधूदुर्गनगरी प्राधिकरण अधिकारी श्री यादव यांना बोलावून घेतले. विमानाला नवीन रंग काढण्यात यावा. प्रवेशद्वार तयार करावे. तसेच माहिती फलक लावण्यात यावा, अशा सूचना केल्या.

You cannot copy content of this page