आमदार नितेश राणे यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना; पत्रकार परिषदेत दिली माहिती
सिंधुदुर्गनगरी दि १४-: जिल्हा नियोजन बैठक गेली वर्षभर झाली नसल्याने जिल्ह्यातील विविध विकास कामे रखडली आहेत .तरी तात्काळ जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करा. अशी सूचना जिल्हाधिकारी यांना केली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. देवगड कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी चिराग माईन्स कंपनीच्या कामगारांचे उपोषण, विविध प्रकल्प, आणि जिल्हा नियोजन बैठक न झाल्याने रखडलेली विकास कामे याबाबत चर्चा करण्यासाठी आज जिल्हा मुख्यालयाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी उपोषण कर्त्या चिराग माईन्स कंपनीच्या कामगारांशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांची भेट घेत जिल्ह्यातील विविध रखडलेले प्रकल्प, विकास कामे, याबाबत चर्चा केली. तर जिल्हा नियोजन समितीची मागील बैठक २३ जानेवारी २०२० रोजी झाली होती .त्यानंतर कोरोना काळात वर्षभर ही बैठक झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे .विविध विकास कामे रखडली आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत. तर जिल्ह्यात आता विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. कोरोणाची भीती व रुग्ण संख्या कमी झाली आहे . त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामे होण्याच्या दृष्टीने तात्काळ जिल्हा नियोजन समिती बैठकीचे आयोजन करा. अशी सूचना जिल्हाधिकारी यांना केली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
