ग्रामपंचायत निवडणूकांसाठी निवडणूक आयोगातर्फे ट्रू व्होटर अ‍ॅप विकसित

निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध;अ‍ॅपचा मतदारांनी लाभ घेण्याचे प्रभारी तहसीलदार सुधीर पाटील यांनी केले आवाहन

*💫मालवण, दि.१४-:* ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती सर्वसामान्य मतदार, उमेदवार, अधिकाऱ्यांना व्हावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या अ‍ॅपचा मतदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी तहसीलदार सुधीर पाटील यांनी केले आहे. निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या या अ‍ॅप मध्ये निवडणूक आयुक्तांसह, निवडणूक अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, उमेदवार, मतदार, मतदान यंत्रणा यांचा समावेश आहे. या अ‍ॅपवर मतदारांना आपल्या गावातील प्रभागवार उमेदवार तसेच अन्य माहिती उपलब्ध होणार आहे. मतदारांना आपले मतदान केंद्र कोठे आहे याचे लोकेशनही उपलब्ध होणार आहे. मतदानाची प्रक्रिया, मतदानाची टक्केवारी, उमेदवारांना पडलेली मते याची माहितीही सर्वसामान्यांना या अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या अ‍ॅपचा मतदारांनी लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

You cannot copy content of this page