भाजपच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर त्या रस्त्याचे काम अखेर सुरू

मालवण दि -: गेले वर्षभर अपूर्ण अवस्थेत राहिलेल्या आचरा कणकवली रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम लक्ष वेधुनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाला या कामाबाबत भाजपने जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अपूर्ण राहिलेले रस्त्याचे काम चालू झाले असून या कामाचा शुभारंभ माजी बांधकाम सभापती विद्यमान जि प सदस्य जेरोन फर्नांडीस यांनी आचरा बंदर येथे ग्रामस्थांसमवेत श्रीफळ वाढवून केले यावेळी जि.प. सदस्य जेरॉन फर्नांडिस यांच्या समवेत आचरा पिरावाडीतील ग्रामस्थ इमू मुजावर, संतोष कुबल, सय्यद मुकादम, राजा मुळेकर, दादा धुरी, मंदार खोबरेकर, आदिल मुजावर, मोहन परब, दत्तराज तळवडकर, सुर्यकांत धुरी, जयदीप कुबल उपस्थित होते यावेळी फर्नाडिस म्हणाले की गेल्यावर्षी आचरा कणकवली रस्त्याचे डांबरीकरण मंजूर झाल्यानंतर त्या कामाची कणकवली वरून कामास सुरुवात झाली होती हे काम फक्त कणकवली ते आडवली या दरम्यान झाले होते त्यानंतरचे अडवली ते आचरा दरम्यान चे डांबरीकरण रखडले होते याला बराच काळ लोटला तरी कामाची सुरुवात झाली नव्हती सार्वजनिक बांधकाम विभागकडे सातत्याने याबाबत पाठपुरावा केला मात्र मी व मालवण भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी भाजपच्या वतीने काम चालू करण्याची मागणी करत काम चालू न झाल्यास आंदोलन चढणार असल्याचा ईशारा दिला होता. आचरा भागाचा विचार केला तर आचरातिठा ते आचराबंदर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती, धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते दुचाकी तीनचाकी वाहनांना कसरत करत खड्डे चुकवत प्रवास करावा लागत होता रस्त्याचे काम चालू झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी व्ही कांबळी सकाळपासून स्वतः हजर राहत कामावर लक्ष ठेऊन होते फोटो आचरा बंदर रस्त्याचे रखडलेले डांबरीकरणाचे काम झाले चालू झाले यावेळी जी प सदस्य जेरोन फर्नांडिस यांनी ग्रामस्थाच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ केला (छाया अर्जुन बापर्डेकर आचरे )

You cannot copy content of this page