आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या धरण ग्रस्ताची मृत्युशी झुंज अपयशी

वैभववाडीः अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात घर जमिन जागा बुडीत क्षेत्रात जाऊनही त्याचा योग्य मोबदला मिळालेला नाही.निवासी भूखंडाची ताबा पावती मिळाली नाही.या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करणारे धरणग्रस्त शांताराम विठ्ठल नागप यांचे अखेर सातव्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.त्यांच्यावर मुंबई केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते.त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. धरणग्रस्त शांताराम नागप यांचे आखवणे नागपवाडी येथील घर, जमिन, अरुणा धरण प्रकल्पात बुडीत क्षेत्रात गेली आहे.माञ त्यांना घर, जमिन, झाडे याचा योग्य मूल्यांकण मिळालेले नाही.तसेच त्यांना उंबर्डे येथील पुनर्वसन गावठाणात निवासी भूखंड देण्यात आला आहे.याठिकाणी त्यांनी घरही बांधले आहे.माञ त्या भूखंडाची ताबा पावती त्यांना मिळालेली नाही.त्यामुळे त्यांना घरात नवीन वीज जोडणी मिळाली नाही.यासाठी दोन वर्षे वारंवार पाठपुरावा करुनही त्यांना ताबा पावती मिळालेली नाही.यामुळे त्यांनी नैराश्येतून दि.६ जानेवारी रोजी सकाळी उंदिर मारायचे विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.असा जबाब त्यांनी मृत्यू पूर्वी वैभववाडी पोलिसांना दिला आहे.त्यांना तातडीने वैभववाडी ग्रामिण रुग्णालयात तिथून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.माञ त्याची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत होती.त्यामुळे त्यांना कोल्हापूर व कोल्हापूरहून मुंबई केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याठिकाणी बुधवारी सायंकाळी उशीरा त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, सून, भाऊ असा परिवार आहे. योग्य मोबदला मिळाला नाही.व ताबा पावती मिळाली नाही म्हणून धरणग्रस्तांवर आत्महत्येसारख टोकाच पाऊल उचलण्याची वेळ धरणग्रस्तावर आल्यामुळे धरणग्रस्तांमधून प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.प्रकल्पग्रस्तांचे प्रलबित प्रश्न सोडवून त्यांना योग्य न्याय देण्यात यावा.जेणेकरुन पुन्हा कोणावर अशी वेळ येऊ देऊ नये.अशी अपेक्षा प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे. फोटो- शांताराम नागप.

You cannot copy content of this page