जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची माहिती
*💫देवगड दि.१४-:* देवगड तालुक्यामधील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ६० केंद्रावरती ३६० कर्मचा-यांची नेमणुक करण्यात आली आहे. व सर्व मतदान पेटया मतदान केंद्रावरती रवाना करण्यात आल्या आहेत. तालुक्यामधील २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहिर झाल्या होत्या. त्यापैकी २ ग्रामपचांयतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी ६० केंद्रावरती मतदान पेटयासहित ३६० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २१ निवडणुक अधिका-यांचीही नेमणुक करण्यात आली आहे. यामध्ये १०२ पोलिस कर्मचारी व अधिकारी यामध्ये ३३ होमगार्ड व पाच पोलिस अधिका-यांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांचे \िरते भरारी पथकही कार्यरत राहणार आहे. विशेषतः करुन तालुक्यातील सर्वात मोठया लोकसंख्येने असलेल्या पुरळ व शिरगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुक मतदानाच्यावेळी विशेष लक्ष सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठेवण्यात आले आहे.
