सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीए शैलेश मुंडये…

⚡कुडाळ ता.२९-: सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीए शैलेश मुंडये यांची तर सचिव पदी सीए युगांत चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) रविवारी हॉटेल स्पाईस कोकण, कुडाळ येथे यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सीए शैलेश मुंडये,
सचिव पदी सीए युगांत चव्हाण, जीएसटीपी, खजिनदारपदी भूषण तेजम यांची निवड करण्यात आली.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संघटना करदात्यांच्या हितासाठी सक्रियपणे कार्य करण्यास तसेच व्यावसायिक क्षेत्रात सकारात्मक योगदान देण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष सीए सागर तेली आणि सीए जयंती कुलकर्णी तसेच सीए सुनील सौदागर, सीए नीलकंठ मराठे, सीए जबक मालदार आणि इतर चार्टर्ड अकाउंटंट्स व कर सल्लागार कार्यक्रमास उपस्थित होते. नव्याने पात्र ठरलेल्या सीए शर्वाणी कुलकर्णी आणि वरिष्ठ कर सल्लागार श्रीपाद ताम्हणकर यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page