सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि माऊली ग्रामविकास कला क्रीडा मंडळाचे आयोजन..
⚡सावंतवाडी ता.२९-:
सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि श्रीदेवी माऊली ग्रामविकास कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोलझर गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकिय शिबिरात कोलझर गावातील सुमारे १०० गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.
कोलझर समाजसेवा हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्द्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव देसाई यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडीच्या जिवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ शंकर सावंत, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ प्रविणकुमार ठाकरे, मधुमेह व हृदय रोग डॉ नंदादीप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, स्त्रि रोग तज्ञ डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ स्वप्निल परब, ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, श्री देवी माऊली ग्रामविकास कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा पोलिस पाटील तातोबा देसाई, सचिव अमर सावंत, दीपक देसाई, सिद्धेश देसाई मनोजकुमार देसाई, मंदार देसाई, चेतन पास्ते, आबा देसाई, शत्रुघ्न सावंत आदी उपस्थित होते.
या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, हृदय रोग डॉ नंदादीप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, स्त्रि रोग तज्ञ, डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ स्वप्निल परब यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात रुग्णांची ब्लड शुगरची तपासणी लॅब टेक्निशियन श्वेता नाईक यांनी केली. त्यानंतर रुग्णांना आवश्यक मोफत औषधे देण्यात आली. या शिबिरासाठी श्री देवी माऊली ग्रामविकास कला क्रीडा मंडळाचे आणि समाजसेवा हायस्कूलचेही सहकार्य लाभले.
यावेळी गावात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री देवी माऊली ग्रामविकास कला क्रीडा मंडळासह कोलझर ग्रामस्थांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या आरोग्य सेवेच्या उपक्रमाचे कौतुक करीत सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले. या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गुरुनाथ राऊळ, श्रीकांत दळवी, अँड्र्यू फर्नांडिस, भगवान रेडकर, संतोष नाईक, दीपक गावकर, राहुल ठाकूर, वेदा सावंत, सिद्धेश मणेरीकर यांनी केले.
