⚡कुडाळ ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष पदी वैभववाडी येथील संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुडाळ येथे झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृह येथे पार पडली. या सभेमध्ये तीन वर्षाकरिता नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून वैभववाडी येथील संजय सावंत यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, कार्यवाह म्हणून तळेरे येथील राजू जठार, सहकार्यवाह म्हणून कुडाळ येथील राजन नाईक, उपाध्यक्ष म्हणून बागायतचे दीपक भोगले, सावंतवाडीचे पुंडलिक दळवी व कुडाळचे अवधूत शिरसाट, कोषाध्यक्ष म्हणून वेंगुर्ले येथील नंदन वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रसाद पारकर, श्रीपाद चोडणकर, प्रल्हाद पावले, संजय भोगटे, दीपक बेलवलकर, गणेश बोर्डेकर, हर्षल बांदेकर, विजय केनवडेकर, संतोष नानचे, नंदकिशोर टोपले, सुधीर साटम, अश्विन पांगम, दिगंबर तांडेल यांची निवड करण्यात आली, तर स्वीकृत सदस्य म्हणून सौ तृप्ती पारकर, अरविंद नेवाळकर, श्रीराम शिरसाट, निलेश धडाम यांची निवड करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया अनिल सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सावंत…
