पी.एम. श्री शाळेला सभापती गणेश राणे यांची प्रेरणादायी भेट…

जामसंडे केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन; शिक्षण परिषदेत उत्स्फूर्त सहभाग..

⚡देवगड ता.२९-: देवगड पंचायत समितीचे सभापती श्री. गणेश राणे आणि उपसभापती श्री. अमोल लोके यांनी पी.एम. श्री शाळा जोशी विद्यामंदिर जामसंडे नं. १ ला प्रेरणादायी भेट दिली. या भेटीदरम्यान जामसंडे केंद्राची शिक्षण परिषद सुरू असताना केंद्रातील सर्व शिक्षकांशी त्यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले.
या वेळी जामसंडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. सुदाम जोशी यांनी सभापती आणि उपसभापती यांचे स्वागत केले. उपस्थित शिक्षकांना संबोधित करताना सभापती श्री. गणेश राणे यांनी शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्रीम. सुमेधा तेली मॅडम तसेच जामसंडे केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page