Headlines

Global Maharashtra Breaking News

कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते उमेश सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन

*💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडीतील कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते खासकीलवाडा येथील रहिवासी उमेश शशिकांत सावंत ( वय ४५) यांचे अल्पशा आजाराने काल दिनांक २५ जुन रोजी निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Read Full News

जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त घेतलेल्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सान्वी महाजन व आर्या सातवसे प्रथम

अट्टल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन सावंतवाडीच्यावतीने आयोजन *💫सावंतवाडी दि.२६-:* अट्टल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन सावंतवाडीच्यावतीने जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत लहान गटात सान्वी शैलेश महाजन तर मोठ्या गटात आर्या नितीन सातवसे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला या चित्रकला स्पर्धेसाठी बालकामगार मुलांच्या समस्या हा विषय होता. ही स्पर्धा ७ ते १२ (लहान…

Read Full News

गोळवण कृषि सहाय्यक आत्महत्या प्रकरणी सहाही संशयिताना अटकपूर्व जामीन

मुंबई उच्च न्यायालयाने दिला सशर्त जामीन दिल्यानी मिळाला दिलासा *💫मालवण दि.२६-:* मालवण तालुक्यातील गोळवण येथील कृषी सहाय्यक विशाल हंगे याच्या आत्महत्येप्रकरणी मालवण पोलिसात गुन्हा दाखल झालेल्या संशयितांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून या सहाही संशयितांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. संशयितांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अभय खांडेपारकर, अॅड. स्वरुप पई, अॅड…

Read Full News

फोंडाघाट व वैभववाडी येथे दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

मकरंद सावंत, अनिल सेधा यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी *💫कणकवली दि.२६-:* कणकवली तालुक्यातील फोंडाघाट व वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले.तत्कालीन काँग्रेसचे नेते कै. वाय डी सावंत यांचे सुपुत्र मकरंद सावंत व कॅनडा स्थित उद्योजक अनिल सेधा यांच्या माध्यमातून तसेच कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या विशेष प्रयत्नातून हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. यापूर्वी…

Read Full News

केंद्र सरकार विरोधात कॉंग्रेसची घोषणाबाजी

सावंतवाडी तहसीलसमोर केले आंदोलन *💫सावंतवाडी दि.२६-:* छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अघोषित आणीबाणी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार कार्यालय समोर भर पावसात हे आंदोलन केले आहे. तालुका प्रमुख महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी तालुका प्रमुख महेंद्र सांगेलकर, उप तालुका प्रमुख सच्चिदानंद बुगडे, शहराध्यक्ष राघवेंद्र…

Read Full News

…तरच शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो

फोंडाघाटमध्ये भात लागवडीचे प्रात्यक्षिक_ *💫कणकवली दि.२६-:* शेती फायद्यात आणायची असेल तर किंवा पुर्नप्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी यांत्रिकीकरणाद्वारे भात- शेती केल्यास अनेक बाबींमध्ये आणि वेळेमध्ये कपात-बचत होऊन अधिक उत्पन्नामुळे फायदा होतो व शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो असे विचार फोंडाघाट येथे यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिकप्रसंगी मान्यवरानी व्यक्त केले. शासनाच्या कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत फोंडाघाट येथील प्रगतशील शेतकरी संजय…

Read Full News

‘ इलेक्शन मेरीट ‘ मुळे निवडून आलेल्या उमेदवारांमुळे देश उध्वस्त

ही तर भारतीय लोकशाहीची शोकांतिका :प्रा . महेंद्र नाटेकर *💫कणकवली दि.२६-:* लोकशाही ही आदर्श राज्यपद्धती असल्याने इंग्लंड , अमेरिका इत्यादी पाश्चिमात्य देशांनी राजेशाही किंवा हुकूमशाहीचा त्याग करुन लोकशाही राज्य पद्धतीचा अवलंब केला . स्वातंत्र्योत्तर भारताने याच लोकशाहीचा अवलंब करुन देशाचा विकास केला . माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या काळापर्यंत देशाचा लोकशाही पद्धतीने विकास होत होता…

Read Full News

कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत,

निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरलं *💫रत्नागिरी दि.२६-:* कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत, निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरलं. करबुडे बोगद्यात अडकली एक्स्प्रेस ट्रेन. अपघातात कोणीही जखमी नाही.

Read Full News

बांदा येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग

*सुदैवाने जीवितहानी नाही* *💫बांदा दि.२५-:* बांदा येथील महालक्ष्मी स्टीलचे मालक प्रवीण शिरसाट यांच्या घराला शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगीत अडकलेल्या दोन मुलांसह अन्य कुटुंबियांना स्थानिक ग्रामस्थांनी सुरक्षितरित्या बाहेर काढल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली….

Read Full News

हस्ताक्षर स्पर्धेत नील बांदेकर पुन्हा एकदा राज्यात अव्वल

*💫बांदा दि.२५-:* विद्यार्थी हिताय , राज्यस्तरीय समूह, बालसंस्कार संस्था, आयोजित राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये केंद्र शाळा बांदा नं.१ मधिल, इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने हजारो विद्यार्थ्यांमधून बेस्ट 250 आणि त्यातून टॉप-21 मध्ये निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करून अभिनंदनीय विजय संपादन केला आहे. या यशात…

Read Full News

You cannot copy content of this page