‘ इलेक्शन मेरीट ‘ मुळे निवडून आलेल्या उमेदवारांमुळे देश उध्वस्त

ही तर भारतीय लोकशाहीची शोकांतिका :प्रा . महेंद्र नाटेकर

*💫कणकवली दि.२६-:* लोकशाही ही आदर्श राज्यपद्धती असल्याने इंग्लंड , अमेरिका इत्यादी पाश्चिमात्य देशांनी राजेशाही किंवा हुकूमशाहीचा त्याग करुन लोकशाही राज्य पद्धतीचा अवलंब केला . स्वातंत्र्योत्तर भारताने याच लोकशाहीचा अवलंब करुन देशाचा विकास केला . माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या काळापर्यंत देशाचा लोकशाही पद्धतीने विकास होत होता . परंतु त्यानंतर हळूहळू इलेक्शनला उमेदवार निवडून आणण्यात इलेक्शन मेरीटचा उपयोग करण्यात आल्यानंतर देश उध्वस्त होऊ लागला , असे प्रतिपादन स्वतंत्र कोकणचे अध्यक्ष प्रा.महेंद्र नाटेकर यांनी केले . स्वतंत्र कोकणची सभा आयोजित करण्यात आली होती , त्यावेळी प्रा.नाटेकर बोलत होते . या वेळी वाय.जी.राणे , जे.जे.दळवी , विश्वनाथ केरकर , ए.आय.चिलवान , प्रकाश अधिकारी , धनसे.ए.आर , शिवराम कदम इत्यादी उपस्थित होते . प्रा.नाटेकर पुढे म्हणाले , ‘ इलेक्शन मेरीट ‘ म्हणजे एखाद्या स्थानिक स्वराज्य सभा , विधानसभा , लोकसभा इत्यादी मतदारसंघातून निवडून येण्यासाठी अवैध गोष्टींचा अवलंब करणे , एखाद्या मतदार संघात ज्या जातीचे लोक अधिक असतील त्यातील इच्छुक उमेदवाराला पक्षाची उमेदवारी देणे , दुसऱ्या पक्षाने त्याच जातीचा उमेदवार दिला तर निवडून येण्यासाठी सर्वाधिक पैसा खर्च करणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देणे , दोन्ही – तिन्ही उमेदवार जात , पैसा इत्यादी बाबतीत तुल्यबल असतील तर ज्याची दहशत अधिक आहे , जो निवडून येण्यासाठी काहीही करु शकतो , अशा उमेदवाराला उमेदवारी देणे . सध्या बहुसंख्य उमेदवार ह्या ‘ इलेक्शन ‘ मेरीटमुळे निवडून येऊन विधायक कामे न करता स्वत : च्या तुंबड्या भरतात . लूट केलेल्या पैशातून मतखरेदी करुन पुन्हा – पुन्हा निवडून येतात . निवडून आल्यावर आमदाराला एक लाख रुपये तर खासदाराला दोन लाख रुपये दरमहा वेतन मिळते . पाच वर्षानंतर आमदाराला किमान पन्नास हजार तर खासदाराला किमान एक लाख रुपये दरमहा पेन्शन मिळते . ४० % लोक दारिद्र्य रेषेखाली असताना तथा कथित आमदार खासदार दरमहा लाखो रुपये राजमार्गाने मिळवतात त्याशिवाय अन्य मार्गाने लूट असतेच.भारतीय लोकशाहीची ही शोकांतिका आहे . भारत हे आपले कुटुंब आहे . प्रत्येक कुटुंब सदस्याला स्वत : च्या पायावर उभे करणारे विनामूल्य शिक्षण दिले पाहिजे . विनामूल्य आरोग्य सुविधा व रोजगार दिला पाहिजे ही घटनादत्त जबाबदारी असल्याने ती कोणत्याही सत्ताधारी पक्षाला टाळता येणार नाही . जात , धर्म , पैसा व दहशत हे ‘ इलेक्शन मेरीट ‘ मोडीत काढण्यासाठी आपली राज्यघटना व संबंधित राज्याने वेळोवेळी केलेले कायदे यांच्यावर आधारित १०० गुणांची लेखी परीक्षा घ्यावी . जे उमेद ७५ % अधिक गुण मिळवतील त्यांना कोणत्याही पक्षांतून निवडणूक लढवता येईल . असे उमेदवार प्रशासनावर वचक ठेवून देशाचा कारभार कार्यक्षमतेने पार पाडतील असे शेवटी प्रा . नाटेकर म्हणाले .

You cannot copy content of this page