…तरच शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो

फोंडाघाटमध्ये भात लागवडीचे प्रात्यक्षिक_

*💫कणकवली दि.२६-:* शेती फायद्यात आणायची असेल तर किंवा पुर्नप्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी यांत्रिकीकरणाद्वारे भात- शेती केल्यास अनेक बाबींमध्ये आणि वेळेमध्ये कपात-बचत होऊन अधिक उत्पन्नामुळे फायदा होतो व शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो असे विचार फोंडाघाट येथे यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिकप्रसंगी मान्यवरानी व्यक्त केले. शासनाच्या कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत फोंडाघाट येथील प्रगतशील शेतकरी संजय तेली यांच्या शेतावर यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी हजारे, फोंडा कृषीविद्यावेत्ता शेट्ये , माजी सभापती सुजाता हळदिवे-राणे, सरपंच संतोष आग्रे, सदस्य विश्‍वनाथ जाधव, तळेरे मंडल कृषी अधिकारी तोरणे, अनुरेखक धनावडे, सांगवे मंडल अधिकारी सावंत, फोंडाघाट कृषी पर्यवेक्षक निकुम, घोणसरी कृषी सहाय्यक सुवर्णा कानडे, हरकुळ कृषी सहाय्यक तायडे,फोंडा कृषी सहाय्यक अक्षया परब, ग्रामसेवक चौलकर उपस्थित होते. हा उपक्रम कृषी संशोधन केंद्र फोंडाघाट व महाराष्ट्र शासन जिल्हा व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील अनेक भातशेती शेतकरी उपस्थित होते.

You cannot copy content of this page