केंद्र सरकार विरोधात कॉंग्रेसची घोषणाबाजी

सावंतवाडी तहसीलसमोर केले आंदोलन

*💫सावंतवाडी दि.२६-:* छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अघोषित आणीबाणी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार कार्यालय समोर भर पावसात हे आंदोलन केले आहे. तालुका प्रमुख महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी तालुका प्रमुख महेंद्र सांगेलकर, उप तालुका प्रमुख सच्चिदानंद बुगडे, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, ओबिसी जिल्हा उपाध्यक्ष बाप्पा नाटेकर, तालुका कॉंग्रेस सेक्रेटरी संजय लाड, तालुका सरचिटणीस संजय राऊळ, विनोद मल्लार, आनंद कुंभार, मिलिंद बोट, समीर भाट, बबलू डिसोजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page