मकरंद सावंत, अनिल सेधा यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
*💫कणकवली दि.२६-:* कणकवली तालुक्यातील फोंडाघाट व वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले.तत्कालीन काँग्रेसचे नेते कै. वाय डी सावंत यांचे सुपुत्र मकरंद सावंत व कॅनडा स्थित उद्योजक अनिल सेधा यांच्या माध्यमातून तसेच कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या विशेष प्रयत्नातून हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. यापूर्वी मकरंद सावंत यांच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरला देखील नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मागणीनुसार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले होते.ग्रामीण भागातील रुग्णांना असलेली गरज व नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सूचित केल्या नुसार हे कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. यावेळी फोंडाघाट येथे सभापती मनोज रावराणे, सरपंच संतोष आग्रे, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत, भाजपाचे राजन चिके, विश्वनाथ जाधव, दिवाकर सावंत डॉ. जंगम आदी उपस्थित होते. तर वैभववाडी येथे महेश रावराणे, प्राध्यापक एस. एन. पाटील यांनी हे कॉन्सन्ट्रेटर वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल पवार यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत, विस्तार अधिकारी आनंद चव्हाण, डॉ.अभिजित कुंभार, परिचारिका वैष्णवि घुगरदरे, माधुरी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
