अट्टल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन सावंतवाडीच्यावतीने आयोजन
*💫सावंतवाडी दि.२६-:* अट्टल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन सावंतवाडीच्यावतीने जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत लहान गटात सान्वी शैलेश महाजन तर मोठ्या गटात आर्या नितीन सातवसे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला या चित्रकला स्पर्धेसाठी बालकामगार मुलांच्या समस्या हा विषय होता. ही स्पर्धा ७ ते १२ (लहान गट) व १२ ते १८ (मोठा गट) अशा दोन वयोगटात घेण्यात आली होती. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर सांगली, मिरज, कोल्हापूर आदी भागातूनही मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दोन्ही गटातील मुलांनी स्पर्धेच्या विषयाला अनुसरून कल्पकतेने आकर्षक अशी चित्रे रेखाटून चित्राद्वारे बालकामगार मुलांच्या समस्या अधोरेखित केल्या. स्पर्धेत दोन्ही गटांकडून ६५ मुला मुलींनी भाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे कलाशिक्षक मालवणकर यांनी केले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे लहान गट प्रथम क्रमांक सान्वी शैलेश महाजन, द्वितीय क्रमांक आदया निनाद नाईक, तृतीय क्रमांक स्वरा प्रमोद पाटील, मोठा गट प्रथम क्रमांक आर्या नितीन सातवसे, द्वितीय क्रमांक विष्णुप्रसाद संतोष सावंत, तृतीय क्रमांक भास्कर परेश शिरसाट यांनी यश मिळवले. यशस्वी विजेत्या स्पर्धकांना चाईल्ड लाईनच्यावतीने पुस्तक, प्रशस्तीपत्रक आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांचे अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व चाईल्डलाईनचे संचालक अॅड नकुल पार्सेकर व कार्यवाह डॉ राजशेखर कार्लेकर यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी चाईल्ड लाईनच्या समन्वयक पूनम पार्सेकर व टीम मेंबर प्रज्ञा तांबे आणि अॅड चिन्मय वंजारी यांनी विशेष विशेष परिश्रम घेतले.
