Headlines

Global Maharashtra Breaking News

कुशेवाडा ग्राम पंचायतला राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार बहाल

२०१७-१८ मध्ये स्वच्छ्ता अभियानात मिळविला होता राज्यात तृतीय क्रमांक *💫ओरोस दि.०१-:* आपल्या महाराष्ट्रला संताची परपंरा आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा वसा दिला आहे. हेच स्वच्छतेचे कार्य पुढे नेण्याचे काम सरकारच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. जेथे जिद्द व निश्चय असतो तेथे यश नक्की मिळते त्यामुळेच हागणदारी मुक्त महाराष्ट्राप्रमाणे कोरोना मुक्त महाराष्ट्र नक्की होईल,…

Read Full News

*आंबोली मुख्य धबधब्याजवळ मोठा दगड कोसळला*

*💫आंबोली दि.०१-:* आंबोली घाटात आज सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान मुख्य धबधब्याजवळ एक भला मोठा दगड खाली कोसळला आहे. परंतु, सुदैवाने यावेळी पर्यटन बंद असल्याने मोठा अपघात घडला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेली २ वर्ष कोणतेही काम न केल्याने, हा अपघात घडला असून, या अपघाताला बांधकाम विभागानेच आमंत्रण दिले आहे. असा आरोप आंबोली ग्रामपंचायतीने केला आहे….

Read Full News

जाणवली येथील कल्पना श्रीरंग प्रभू यांचे निधन

*💫कणकवली दि.०१-:* कणकवली तालुक्यातील जाणवली येथील रहिवाशी व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आरोग्यसेविका सौ .कल्पना श्रीरंग प्रभू (55, पूर्वाश्रमीच्या कल्पना सामंत) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जाणवली येथील पशु सर्वचिकित्सालयातील पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीरंग प्रभू यांच्या त्या पत्नी होत. तर सांडवे हायस्कूल येथील शिक्षक संजय सामंत यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून असा…

Read Full News

एस. टी. च्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना अपेक्षित प्रवासांची वानवा

स्थानिक फेऱ्या सुरू करण्याची मागणी *💫कणकवली दि.०१-:* सिंधुदुर्ग राज्य परिवहन विभागाने २८ जूनपासून सुरु केलेल्या लांब पल्ल्याच्या एस. टी. च्या फेऱ्याना प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ग्रामीण भागातील फेर्यां अद्याप सुरू नसल्याने खेड्यापाड्यांतील जनतेची मोठी गैरसोय होत आहे. या फेऱ्या त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांपैकी कोल्हापूर, पुणे गाड्यांना जेमतेम प्रवासी…

Read Full News

रोटरी क्लब मालवण कडून डॉक्टरांचा करण्यात आला सन्मान

मालवण (प्रतिनिधी) डॉक्टर्स डे चे औचित्य साधुन राेटरी क्लब मालवण तर्फे मालवण मधील डॉक्टरांचा यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. प्रशांत पवार, डॉ. अविनाश झाट्ये, डॉ. मालविका झाट्ये, डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. दर्शन खानोलकर यांना रोटरीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रोटरी क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष उमेश सांगोडकर, नूतन सचिव रतन पांगे, माजी अध्यक्ष ऍड….

Read Full News

भाजप शहर महिला मंडल कडून डॉ. पाटील आणि डॉ दुर्भाटकर यांचा सन्मान

*डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने करण्यात आला सन्मान* *💫सावंतवाडी दि.०१-:* आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी शहर भाजप महिला मंडलच्या माध्यमातून शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पाटील आणि डॉ. दुर्भाटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सद्य कठीण परिस्थितीत डॉक्टर हे जनतेसाठी देव…

Read Full News

मालवण रोटरी क्लबची नवीन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्ष उमेश सांगोडकर, सचिव भाऊ साळगावकर मालवण दि प्रतिनिधी गेली २३ वर्षे मालवणच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रोटरी क्लब मालवणच्या सन २०२१- २२ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून मालवणच्या रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रो. उमेश सांगोडकर तर सचिव पदी रो. रतन पांगे व खजिनदार पदी रो. भाऊ साळगावकर यांची निवड करण्यात आली आहे….

Read Full News

डॉ जितेंद्र केरकर यांचा ग्रामस्थाच्यावतीने सत्कार

डॉक्टर्स डे चे निमित्त मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली गावात गेली २५ ते ३० वर्षे वैद्यकीय सेवा देणारे तसेच कोरोना काळातही अनेक कोरोना रुग्णांना सेवा देणारे डॉ. जितेंद्र केरकर यांच्या या योगदानाबद्दल तारकर्ली ग्रामस्थांकडून डॉक्टर्स डेच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. तारकर्ली येथील रांजेश्वर मंदिरात डॉ. जितेंद्र केरकर यांचा सत्कार करण्यात आला. अशोक फाटक व ग्रामस्थांच्यावतीने त्यांना…

Read Full News

डोंगरपाल येथे सावंतवाडी तालूका कृषि मेळावा संपन्न

सावंतवाडी-: सावंतवाडी हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांची १०८ वी जयंती श्री माऊली मंदिर डोंगरपाल येथे तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी, पंचायत समिती सावंतवाडी व ग्रुप ग्रामपंचायत डिंगणे यांचे संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी कृषी विस्तार अधिकारी एकनाथ सावंत यांनी…

Read Full News

बांधवाडी नजिक कारला अपघात

चालक सुखरूप:मात्र, गाडीचे मोठे नुकसान वैभववाडी प्रतिनिधी रस्त्यातील खड्डयाचा अंदाज न आल्याने बांधवाडी नजीक कारला अपघात झाला. या अपघातात चालक राकेश चव्हाण रा. हुंबरट हा बालबाल बचावला आहे. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. चालक राकेश चव्हाण आपल्या ताब्यातील कार (नं. एमएच-01-बीबी- 6404) घेऊन कुडाळहुन सांगलीकडे जात…

Read Full News

You cannot copy content of this page