चालक सुखरूप:मात्र, गाडीचे मोठे नुकसान
वैभववाडी प्रतिनिधी रस्त्यातील खड्डयाचा अंदाज न आल्याने बांधवाडी नजीक कारला अपघात झाला. या अपघातात चालक राकेश चव्हाण रा. हुंबरट हा बालबाल बचावला आहे. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. चालक राकेश चव्हाण आपल्या ताब्यातील कार (नं. एमएच-01-बीबी- 6404) घेऊन कुडाळहुन सांगलीकडे जात होता. बांधवाडी नजीक असलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. आणि गाडी रस्त्याकडील झाडाला जोरदार आदळली. या अपघातात चालक चव्हाण किरकोळ जखमी झाला आहे. तर कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी चे माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, वैभव कोकाटे व संतोष महाडिक यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.
