रोटरी क्लब मालवण कडून डॉक्टरांचा करण्यात आला सन्मान

मालवण (प्रतिनिधी) डॉक्टर्स डे चे औचित्य साधुन राेटरी क्लब मालवण तर्फे मालवण मधील डॉक्टरांचा यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. प्रशांत पवार, डॉ. अविनाश झाट्ये, डॉ. मालविका झाट्ये, डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. दर्शन खानोलकर यांना रोटरीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रोटरी क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष उमेश सांगोडकर, नूतन सचिव रतन पांगे, माजी अध्यक्ष ऍड. हेमेन्द्र गोवेकर, चाचा हडकर, बाळू तारी, सुहास ओरसकर, अमेय पारकर, अभय कदम, अभय कवटकर, संजय गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page