*डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने करण्यात आला सन्मान*
*💫सावंतवाडी दि.०१-:* आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी शहर भाजप महिला मंडलच्या माध्यमातून शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पाटील आणि डॉ. दुर्भाटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सद्य कठीण परिस्थितीत डॉक्टर हे जनतेसाठी देव असून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्व डॉक्टर, नर्स आणि इतर सर्व स्टाफ करत असलेले कार्य शब्दात सांगता येणार नाही, एवढे महान कार्य ते जनतेसाठी करत आहेत. अशा शब्दात आपल्या भावना शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी डॉक्टर दिनानिमित्त सर्व डॉक्टर, नर्स आणि संपूर्ण स्टाफला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी परिणीती वर्तक, मेघना साळगावकर, ज्योती मुद्राळे, बेला पिंटो, अदिती दळवी आदी उपस्थित होते.
