अध्यक्ष उमेश सांगोडकर, सचिव भाऊ साळगावकर
मालवण दि प्रतिनिधी गेली २३ वर्षे मालवणच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रोटरी क्लब मालवणच्या सन २०२१- २२ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून मालवणच्या रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रो. उमेश सांगोडकर तर सचिव पदी रो. रतन पांगे व खजिनदार पदी रो. भाऊ साळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा झूम ऍप द्वारे ऑनलाईन पद्धतीने दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता हॉटेल अनमोल येथे होणार असल्याची माहिती रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष ऍड रो. हेमेन्द्र गोवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली मालवण येथील हॉटेल अनमोल येथे रोटरी क्लब मालवणची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मावळते अध्यक्ष ऍड. हेमेन्द्र गोवेकर, नूतन अध्यक्ष उमेश सांगोडकर, नूतन सचिव रतन पांगे, नूतन खजिनदार भाऊ साळगावकर, सदस्य बाळू तारी, चाचा हडकर, सुहास ओरसकर, अभय कवटकर, अभय कदम आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष उमेश सांगोडकर म्हणाले, कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. या पावसाच्या पाण्याचा योग्य विनियोग करण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब तर्फे रेन हार्वेस्टिंग सिस्टीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. याशिवाय सुदृढ आरोग्यासाठी योगा व्यायाम चे महत्त्व विचारात घेऊन सर्वांसाठी ‘एक चमक कम चार कदम आगे’ हा कार्यक्रम तसेच शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, वाहनांसाठी मार्गदर्शन फलक, पर्यटन व्यावसायक विषयक कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा, समरगीत स्पर्धा, पेपर बॅग बनविण्याची कार्यशाळा, वृक्षारोपण, कर्करोग निदान शिबिर, कर विषयक सल्ला मार्गदर्शन, अपंगांसाठी जयपूर फूट व हात विषयी कार्यक्रम, डॉ. लीना परांजपे यांचे लग्न आणि संसार याविषयी व्याख्यान, भटक्या गुरा ढोरांसाठी विशेष कार्यक्रम याशिवाय एकता मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येण्याची माहिती त्यांनी दिली. मालवण रोटरी क्लबची नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे, क्लब सर्व्हिस- महादेव पाटकर, कम्युनिटी सर्व्हिस- डॉ. लीना लिमये, व्होकेशनल सर्व्हिस- अनिल देसाई, इंटरनॅशनल सर्व्हिस – डॉ. उल्हास मसुरकर, मेम्बरशिप सर्व्हिस – प्रदीप जोशी, फेलोशिप सर्व्हिस – अजय जोशी, युथ सर्व्हिस – अभय कदम, क्लब ऍडमिन प्रसन्नाकुमार मयेकर, रोटरी फाउंडेशन सर्व्हिस – डॉ. अजित लिमये, क्लब ट्रेनर – ऍड. हेमेन्द्र गोवेकर, पोलिओ डायरेक्टर – डॉ. अच्युत सोमवंशी, बुलेटिन सर्व्हिस- सौ. सुविधा तिनईकर, स्पोर्ट्स सर्व्हिस – मेघनाद धुरी
