डॉ जितेंद्र केरकर यांचा ग्रामस्थाच्यावतीने सत्कार

डॉक्टर्स डे चे निमित्त

मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली गावात गेली २५ ते ३० वर्षे वैद्यकीय सेवा देणारे तसेच कोरोना काळातही अनेक कोरोना रुग्णांना सेवा देणारे डॉ. जितेंद्र केरकर यांच्या या योगदानाबद्दल तारकर्ली ग्रामस्थांकडून डॉक्टर्स डेच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. तारकर्ली येथील रांजेश्वर मंदिरात डॉ. जितेंद्र केरकर यांचा सत्कार करण्यात आला. अशोक फाटक व ग्रामस्थांच्यावतीने त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. स्नेहा केरकर, अमित आचरेकर, शिवा माडये, प्रमोद पेडणेकर, हेमंत पेडणेकर, महादेव नेवाळकर, निकेश नेवाळकर, राकेश चव्हाण, राजेश आचरेकर, अनिकेत आचरेकर, निलेश आचरेकर, बाळू आचरेकर, आनंद आजगावकर, सौ. माडिये, समीर गोवेकर, रोहन मयेकर, यश चव्हाण, संतोष मांजरेकर, आदित्य केरकर, गणेश मोरजकर, किशोर चव्हाण आदी व इतर उपस्थित होते. तारकर्ली गावात कोरोनाचा शिरकाव झाल्यावर जीवाची तमा न बाळगता डॉ. केरकर यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाने माफक शुल्कात कोरोना रुग्णांसाठी सेवा दिली. यातून त्यांची सर्वसामान्य जनतेबद्दल असलेली कळकळ दिसून येते अश्या भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तर तारकर्ली गावात सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुद्ध लढा चालू आहे. यामुळे कोरोना संक्रमण कमी होऊन या लढ्याचा पाया मजबूत झाला आहे. यापुढे गावातील सर्व ग्रामस्थांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. लसीकरण पूर्ण झाल्यावर या लढ्याचा कळस चढवून कोरोनावर विजय मिळवला जाईल असे यावेळी डॉ. केरकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

You cannot copy content of this page