*💫आंबोली दि.०१-:* आंबोली घाटात आज सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान मुख्य धबधब्याजवळ एक भला मोठा दगड खाली कोसळला आहे. परंतु, सुदैवाने यावेळी पर्यटन बंद असल्याने मोठा अपघात घडला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेली २ वर्ष कोणतेही काम न केल्याने, हा अपघात घडला असून, या अपघाताला बांधकाम विभागानेच आमंत्रण दिले आहे. असा आरोप आंबोली ग्रामपंचायतीने केला आहे. यावेळी ६ जुलै रोजी अनिल चव्हाण यांनी बांधकाम कार्यालयासमोर पुकारलेल्या उपोषणाला आंबोली ग्रामपंचायत पूर्ण पाठींबा देणार आहे. असे आंबोली सरपंच बाळा पालेकर यांनी जाहीर केले आहे.
*आंबोली मुख्य धबधब्याजवळ मोठा दगड कोसळला*
