२०१७-१८ मध्ये स्वच्छ्ता अभियानात मिळविला होता राज्यात तृतीय क्रमांक
*💫ओरोस दि.०१-:* आपल्या महाराष्ट्रला संताची परपंरा आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा वसा दिला आहे. हेच स्वच्छतेचे कार्य पुढे नेण्याचे काम सरकारच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. जेथे जिद्द व निश्चय असतो तेथे यश नक्की मिळते त्यामुळेच हागणदारी मुक्त महाराष्ट्राप्रमाणे कोरोना मुक्त महाराष्ट्र नक्की होईल, असे प्रतिपादन राज्याचे मा. मुख्यमंत्री उदव ठाकरे यांनी केले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2017-18 चा बक्षिस वितरण सोहळा 1 जुलै रोजी ऑनलाईन पध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमांस राज्याचे मा. उप मुख्यमंत्री अजित पवार, मा. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, या कार्यक्रमांस ऑनलाईन च्या माध्यमातुन तर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीम. शुभांगी साठे, वेंगुर्ले सभापती अनुश्री काबंळी, सभापती पंचायत समिती वेंगुर्ला, कुशेवाडा सरपंच श्रीम. स्नेहा राऊळ, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे, जिल्हा पाणी व स्वच्छ्ता उपमुख्य कार्ययकारी अधिकारी विनायक ठाकुर, कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2017-18 मध्ये जिल्ह्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतीने राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला होता. या पारितोषिकाचे आज प्रजित नायर, श्रीम. शुभांगी साठे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तृतीय क्रमांक विजेत्या ग्रामपंचायतीस रक्कम रुपये 15 लक्ष चा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले.
