एक गंभीर:बुधवार रात्रीची घटना:सावंतवाडीतील तिघांवर गुन्हा दाखल
*💫सावंतवाडी दि.०१ प्रसन्न गोंदावळे-:* ओव्हरटेक करण्यास साईड न दिल्याच्या रागातून सांगली येथील तिघांना सावंतवाडीतील तीन अज्ञात युवकांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत सांगलीतील एक गंभीर जख्मी झाला असून, त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य दोघांना देखील किरकोळ दुखापती झाल्या आहेत. मारहाण सुरूच असताना सांगलीतील त्या युवकांनी जिवाच्या भीतीने सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी सावतवाडी पोलीस ठाण्यात त्या अज्ञात तिन्ही युवकां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
