Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्लेतील सुसज्ज मच्छीमार्केटचे ११जुलै ला लोकार्पण

केंद्रीयमंत्री नारायण राणे व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार लोकार्पण; नगराध्यक्ष राजन गिरप यांची माहिती *💫वेंगुर्ले दि.०९-:* वेंगुर्ला शहरातील बहुचर्चित अशा सुसज्ज मच्छिमार्केट इमारतीचे ११ जुलै ला केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी…

Read Full News

युवा रक्तदाता संघटना निभावतेय ‘ब्लड बँक’चे जबाबदारी

अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून अनेकांना मिळाले जीवनदान *💫सावंतवाडी दि.०९-:* ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेनं पुन्हा एकदा ‘ब्लड बँक’च काम निभावले आहे. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून या आठवडाभरात अनेकांना रक्त उपलब्ध करून देत जीवनदान देण्यात आले. सावंतवाडी तालुका, सिंधुदूर्ग जिल्ह्यासह गोव्यात ही संघटना रक्तदानाच काम…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २५ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०९ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ६ तर ग्रामीण भागात १९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात खासकील वाडा ३, न्यू खासकील वाडा १, गरड १, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात पाडलोस १, नेतर्डे १, तळवडे ३, आजगाव…

Read Full News

‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत आयुष नाळे ठरला गोल्ड मेडलचा मानकरी…

*💫वैभववाडी दि.०९-:* ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेचा विद्यार्थी कु.आयुष प्रदीप नाळे याने इयत्ता 2 री मध्ये 100 पैकी 99 गुण मिळवून ऑल इंडिया रँक मध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. गेल्यावर्षीही इयत्ता पहिलीत असताना त्याने गोल्ड मेडल प्राप्त केले होते. अशाप्रकारे सलग दुसऱ्या वर्षी आयुषने हे ‘सुवर्णयश’ संपादित केले आहे….

Read Full News

दोडामार्ग ते विजघर बंद असलेली एसटी बससेवा सुरू करा

भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, कोनाळ सरपंच पराशर सावंत यांची मागणी *💫दोडामार्ग दि.०९ सुमित दळवी-:* दोडामार्ग ते विजघर ही एसटी बस सेवा बंद असून ती सुरु करण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रविण गवस व कोनाळ ग्रामपंचायत सरपंच पराशर सावंत यानी आज सावंतवाडी आगारप्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे बऱ्याच ग्रामस्थांना या बसचा फायदा होत होता.मात्र लाँकडाऊन काळापासून…

Read Full News

रोटरीच्या नूतन कार्यकारिणीने दिली अंकुर महिला निवारा केंद्राला भेट

अध्यक्ष साईप्रसाद हवलदार यांच्यासह अन्य रोटरीयन होते उपस्थित;यावेळी करण्यात आले मास्क वाटप *💫सावंतवाडी दि.०९-:* रोटरी क्लब, सावंतवाडीच्या नुतन अध्यक्ष रो. साईप्रसाद हवालदार यानी आपल्या वर्षात महिला सबलीकरणावर भर देण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याप्रमाणे सावंतवाडी येथील शासकीय “अंकुर महिला निवारा केंद्राला” आज रोटेरीयन्स सोबत भेट दिली. त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि वर्षभर या महिला साठी काम करण्याचे…

Read Full News

कोरोनावर मात करण्यासाठी सिंधुमित्र सेवा संघाचा अनोखा उपक्रम

जिल्ह्यात ६० ठिकाणी लावले कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती फलक *💫सावंतवाडी ता.०९-:* कोरोना महामारीचा दीड वर्ष सर्वजण अनुभव घेत आहेत. अद्यापही कोरोना संकट कायम असून या कोरोना प्रतिबंधासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीनेही गेले सव्वा वर्ष कोरोना प्रतिबंधात्मक उपक्रम सुरू असून या प्रतिष्ठानच्यावतीने नुकतेच सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील महत्त्वाचा ६० ठिकाणी…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी २३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३९ हजार १९२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार ९३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

कोरोना संकट टळून लवकरच शाळा पूर्ववत सुरु होतील

चला ज्योत जागवूया कार्यक्रमात डॉ लता मोरे यांचा आशावाद *💫मालवण दि.०९-:* कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणात शिक्षक मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत नाही. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला मारक आहे. लवकरच कोरोनाचे संकट टळून शाळा पूर्ववत सुरू होतील, असा आशावाद डॉ….

Read Full News

सुनंदा तळाशीलकर यांचे निधन

रवी तळाशीलकर यांच्या मातोश्री *💫मालवण, दि.०९-:* मालवण गवंडीवाडा येथील रहिवासी श्रीमती सुनंदा लक्ष्मण तळाशीलकर (वय-८९) यांचे आज शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मनमिळाऊ आणि परोपकारी स्वभावामुळे त्या जनमाणसात लोकप्रिय होत्या. त्यांच्यावर दांडी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मालवण व्यापारी संघाचे कार्यवाह रवी तळाशीलकर यांची ती आई होय. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे, नात…

Read Full News

You cannot copy content of this page