सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २५ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०९ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ६ तर ग्रामीण भागात १९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात खासकील वाडा ३, न्यू खासकील वाडा १, गरड १, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात पाडलोस १, नेतर्डे १, तळवडे ३, आजगाव भोम १, नेणे ७, मळगाव ५, निरवडे कोनापाल १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात २३४ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page