*💫वैभववाडी दि.०९-:* ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेचा विद्यार्थी कु.आयुष प्रदीप नाळे याने इयत्ता 2 री मध्ये 100 पैकी 99 गुण मिळवून ऑल इंडिया रँक मध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. गेल्यावर्षीही इयत्ता पहिलीत असताना त्याने गोल्ड मेडल प्राप्त केले होते. अशाप्रकारे सलग दुसऱ्या वर्षी आयुषने हे ‘सुवर्णयश’ संपादित केले आहे. कु.आयुषला पालक सौ.मेघा नाळे , मुख्याध्यापिका सुप्रिया शेटये,प्रफुल्ल जाधव,अमोल येणगे,प्रदीप नाळे यांचे मार्गदर्शन लाभले. आयुषच्या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे,विस्तार अधिकारी निसार नदाफ,केंद्रप्रमुख शिवाजी पवार,शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून आयुषचे कौतुक होत आहे.
‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत आयुष नाळे ठरला गोल्ड मेडलचा मानकरी…
