भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, कोनाळ सरपंच पराशर सावंत यांची मागणी
*💫दोडामार्ग दि.०९ सुमित दळवी-:* दोडामार्ग ते विजघर ही एसटी बस सेवा बंद असून ती सुरु करण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रविण गवस व कोनाळ ग्रामपंचायत सरपंच पराशर सावंत यानी आज सावंतवाडी आगारप्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे बऱ्याच ग्रामस्थांना या बसचा फायदा होत होता.मात्र लाँकडाऊन काळापासून ही फेरी बंद आहे.त्यामुळे कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची व ग्रामस्थानची मोठी गैरसोय होत होती. ही सर्व बाब आगार प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर येत्या सोमवारपासून एसटी बससेवा सुरू करण्यात येईल असे सावंतवाडी आगार प्रमुख वैभव पडवळे यांच्या वतीने सांगण्यात आले.
