अध्यक्ष साईप्रसाद हवलदार यांच्यासह अन्य रोटरीयन होते उपस्थित;यावेळी करण्यात आले मास्क वाटप
*💫सावंतवाडी दि.०९-:* रोटरी क्लब, सावंतवाडीच्या नुतन अध्यक्ष रो. साईप्रसाद हवालदार यानी आपल्या वर्षात महिला सबलीकरणावर भर देण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याप्रमाणे सावंतवाडी येथील शासकीय “अंकुर महिला निवारा केंद्राला” आज रोटेरीयन्स सोबत भेट दिली. त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि वर्षभर या महिला साठी काम करण्याचे घोषित केले. यावेळी तेथील महिलाना आणि तेथील कर्मचारी वर्गाला N-95 मास्क देऊन रोटरीच्या महिला सबलीकरण कार्याची मुहूर्तमेढ रोवली. या केंद्राच्या व्यवस्थापिका रेश्मा पठाण-शेख आणि कर्मचारी वर्गानी सहकार्य केले. यावेळी सचिव रो. सी. ए. सुधीर नाईक, रो.वसंत करंदीकर, रो.प्रमोद भागवत, रो.सत्यजित धारणकर आणि रो.दिलीप म्हापसेकर उपस्थित होते. सचिव रो.सीए. सुधीर नाईक यानी आभार मानले.
