अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून अनेकांना मिळाले जीवनदान
*💫सावंतवाडी दि.०९-:* ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेनं पुन्हा एकदा ‘ब्लड बँक’च काम निभावले आहे. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून या आठवडाभरात अनेकांना रक्त उपलब्ध करून देत जीवनदान देण्यात आले. सावंतवाडी तालुका, सिंधुदूर्ग जिल्ह्यासह गोव्यात ही संघटना रक्तदानाच काम करते. या आठवड्यात सहज सापडणाऱ्या ‘ए पॉझिटिव्ह’ रक्तगटाचा जिल्ह्यात तुडवडा होता. दरम्यान, या रक्तगटाची आवश्यकता देखील मोठ्या प्रमाणात होती. ओरोस येथील बालाजी अभ्यंकर, सावंतवाडीतील रामा गुरव, ममता वेर्णेकर, सुशिला मेस्त्री, शामल कुडव, दोडामार्गमधील स्नेहल कोरगावकर यांना तातडीनं या रक्ताची आवश्यकता होती. अशा वेळी युवा रक्तदाता संघटना त्यांचा मदतीला धावून आली. सिंधुदुर्ग लाईव्हचे विनायक गांवस, भावेश भिसे, चिराग कदम, जय बांदेकर, सुजय कोठावळे, निमिष पटेकर, साहिल पडवळ, अनंत मेस्त्री, भाऊसाहेब वर्तक आदींनी या आठवड्यात रक्तदान करत अनेकांना जीवदान दिलं. कोरोनाच संकंट असताना रक्ताचे नातेवाईक देखील मदतीला येत नसताना हे युवक पुढे सरसावले. देव्या सुर्याजी यांनी यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत रक्ताची सोय करून दिली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ओ पॉझिटिव्ह या रक्ताची आवश्यकता होती यावेळी श्री भरत पगारे,माठेवाडा या युवकानं तातडीनं रक्तदान केल. संकंट काळात पुढं सरसावलेल्या युवा रक्तदाता संघटनेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
