Headlines

तळवडे येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांना प्रारंभ…

⚡सावंतवाडी ता.२६-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, तसेच तालुका व्यवस्थापन समिती, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय १७ वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे चे अध्यक्ष श्रीकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र कांडरकर, सचिव न्हानू उर्फ दादा पेडणेकर, खजिनदार सुरेश गावडे, संचालक देवेश कावळे, तालुका क्रीडा समन्वयक नंदकुमार नाईक, श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक दयानंद बांगर, पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष उमेश पावणोजी, माजगाव विद्यालय मुख्याध्यापक भाऊसाहेब चवरे तसेच क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संस्था सचिव श्री पेडणेकर व मुख्याध्यापक श्री देसाई यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तालुका क्रीडा समन्वयक श्री नाईक यांनी स्पर्धकांना स्पर्धे संदर्भातील महत्त्वाच्या सूचना दिल्या. श्री जनता विद्यालय चे विद्यार्थिनी कु. आर्या पोवणोजी हिने सर्व खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद बांगर यांनी केले.

या स्पर्धेतील अंतिम विजयी मुलांच्या संघाला शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे यांच्यामार्फत चषक देण्यात येणार आहे. तसेच अंतिम विजयी मुलींच्या संघाला होडावडे येथील क्रीडा साहित्य विक्रेता अमोल परब यांच्यामार्फत चषक देण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page