Headlines

Global Maharashtra Breaking News

पक्षाने काम करण्याची जबाबदारी दिल्यास संधीचे सोने करेन

विरोधकांबद्दल माझ्या मनात कटुता नाही;संदेश पारकर यांचे भावनिक उदगार *💫कणकवली दि.१४-:* 35 वर्षांच्या राजकीय कारकीर्दमध्ये मी अनेक चढ-उत्तार पाहिले आव्हानांचा सामना, भीती, दहशतही अनुभवली पण कधीही मनाने खचलो नाही, तर जनतेच्या हितासाठी व जिल्ह्याच्या विकासाकरिता अविरतपणे काम करत राहिलो म्हणनूच विरोधकांना पुरून उरलो, असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले. राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा…

Read Full News

पावसामुळे तिलारी नदीपात्र तुडूंब

घोटगे परमे पूल पाण्याखाली;संपर्क तुटला *💫दोडामार्ग दि.१४-:* दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.जोरदार पावसामुळे तिलारी नदीपात्र तुडूंब भरले आहे.मुसळधार पावसामुळे घोटगे परमे पूल पाण्याखाली गेला आहे,त्यामुळे घोटगे परमे या गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहेत.

Read Full News

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* खारेपाटण पुलाजवळ आज सायंकाळी 4.30 वा. मोजलेल्या पाणीपातळीनुसार वाघोटन नदीची पातळी 6.000 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी 8.500 मीटर असून धोका पातळी 10.500 मीटर आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.900 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर धोका पातळी 43.600 मीटर…

Read Full News

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे. गुरुवार दि. 15 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता कुडाळ येथून मोटारीने परुळे ता. वेंगुर्लेकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता परुळे येथे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : परुळे बाजारपेठ, वराटी मंगल कार्यालय, परुळे. दुपारी 12.15 वाजता परुळे येथून…

Read Full News

तळवडे येथील युवकाची आत्महत्या

*💫सावंतवाडी ता.१४-:* तालुक्यातील तळवडे येथे एका युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Read Full News

तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर

आळवाडी-मच्छीमार्केटमध्ये पुराचे पाणी : निमजगा-वाफोली रस्ता पाण्याखाली *💫बांदा दि.१४-:* रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने येथील तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. आज सायंकाळी उशिरा नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर येऊन बांदा शहरातीलआळवाडी-मच्छीमार्केटमध्ये घुसले. शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे. शहरातील निमजगा-वाफोली रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद…

Read Full News

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवल कोविड सेंटर मधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपक्रम *💫कणकवली दि.१४-:* शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आला.यावेळी सन्मानपत्र, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन २४ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना…

Read Full News

मुसळधार पावसाने बांदा दशक्रोशीला झोडपले

पाडलोस केणीवाडा शाळेवर झाड पडून नुकसान *💫बांदा दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारी दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी जोमाने कोसळत राहिल्या. सखल भागात पाणी साचल्यामुळे भात लावणीची कामे खोळंबली. मडुरा माऊली मंदिर पूल व शेर्ले कापई पूल पाण्याखाली गेले होते तर पाडलोस जिल्हा परिषद शाळा नंबर दोनच्या शौचालयावर झाड…

Read Full News

सुबोध टिकले स्मरणार्थ आयोजित शिबिरात १०१ रक्तदात्यांचा सहभाग

संदेश पारकर वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ​​ *💫​कणकवली दि.१४-:* ​शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कै. सुबोध टिकले स्मरणार्थ रक्तदान शिबिरात ​१०१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दरवर्षीच विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात. या वर्षी देखील या सामाजिक…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३७ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१४ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३७ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात ३० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात बाहेरचावाडा १, सालईवाडा १, बिरोडकरटेंब २, खासकीलवाडा १, भटवाडी १, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात मळगाव १२, तळवडे १०, माजगाव १,…

Read Full News

You cannot copy content of this page