*💫सावंतवाडी दि.१४ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३७ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात ३० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात बाहेरचावाडा १, सालईवाडा १, बिरोडकरटेंब २, खासकीलवाडा १, भटवाडी १, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात मळगाव १२, तळवडे १०, माजगाव १, माडखोल २, बांदा १, तळवणे १, नेमळे १, चराठा १, निरवडे १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात २५५ रुग्ण सक्रिय आहेत.
