पाडलोस केणीवाडा शाळेवर झाड पडून नुकसान
*💫बांदा दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारी दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी जोमाने कोसळत राहिल्या. सखल भागात पाणी साचल्यामुळे भात लावणीची कामे खोळंबली. मडुरा माऊली मंदिर पूल व शेर्ले कापई पूल पाण्याखाली गेले होते तर पाडलोस जिल्हा परिषद शाळा नंबर दोनच्या शौचालयावर झाड पडून मोठे नुकसान झाले. पाडलोस केणीवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोनच्या शौचालयावर भलेमोठे झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर यांनी तात्काळ शाळेस भेट देत पाहणी केली व तशी माहिती वरिष्ठांना दिली. शाळा समिती अध्यक्ष हर्षद परब यांनीही पाहणी करत झालेली नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली सावंतटेम्ब येथे महामार्गावर पाणी आले होते. दुचाकी वगळता अन्य सर्व वाहतूक सुरू होती.

