*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* खारेपाटण पुलाजवळ आज सायंकाळी 4.30 वा. मोजलेल्या पाणीपातळीनुसार वाघोटन नदीची पातळी 6.000 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी 8.500 मीटर असून धोका पातळी 10.500 मीटर आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.900 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 7 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे.
जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
