तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर

आळवाडी-मच्छीमार्केटमध्ये पुराचे पाणी : निमजगा-वाफोली रस्ता पाण्याखाली

*💫बांदा दि.१४-:* रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने येथील तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. आज सायंकाळी उशिरा नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर येऊन बांदा शहरातीलआळवाडी-मच्छीमार्केटमध्ये घुसले. शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे. शहरातील निमजगा-वाफोली रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली-सावंतटेम्ब येथे पावसाचे पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. शेर्ले येथील जुने कापई पूल आज दिवसभर पाण्याखाली होते. या परिसरात शेतीत पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनी नव्यानेच केलेली भाताची लावणी वाहून गेली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

You cannot copy content of this page