Headlines

Global Maharashtra Breaking News

अडाळी एम आय डी सी ची सुविधा विषयक कामे पूर्ण करा

*पालकमंत्री उदय सामंत *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* अडाळी एम आय डी सी बाबत रस्ता आणि अनुषंगिक सुविधेची दर्जेदार कामे पूर्ण करावीत, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.* अडाळी एम आय डी सी बाबत आज आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार दीपक केसरकर, तहसीलदार अरुण खानोलकर, राजाराम म्हात्रे, प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, उपअभियंता अविनाश…

Read Full News

दांडेली पूल पाण्याखाली

नदीचे पाणी बागायतीत शिरले : वाडीचा गावाशी संपर्क तुटला *💫बांदा दि.१४-:* सावंतवाडी-न्हावेली-दांडेली-आरोंदा मार्गावरील दांडेली येथील पूल आज सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. पुलावर चार ते पाच फूट पाणी आल्याने चार तास वाहतूक खोळंबली होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस जोरदार सुरू असल्याने दांडेलीवाडीचा गावाशी संपर्क तुटला होता. वारंवार पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात मागणी करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत…

Read Full News

मसुरेत विज कर्मचाऱ्यांना रेनकोट व मास्क वाटप

*💫मालवण दि.१४-:* मसुरे विभागातील सर्व वीज वितरण कर्मचाऱ्यांना रेनकोट, मास्क व सॅनिटायझर बॉटलचे वाटप मसुरे बाजारपेठ नजीक साई मंदिर येथे करण्यात आले.माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर व उद्योजक समीर प्रभुगावकर यांच्या वतीने सदर साहित्य देण्यात आले. यावेळी वीज कर्मचारी स्वप्नील धामपूरकर, अमीत बागवे, विनोद परब, प्रफुल्ल परब, रुपेश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. तौक्ते…

Read Full News

वॉटर क्युरिफायरमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार

जी प सर्वसाधारण सभा वादळी *💫ओरोस दि.१४-:* प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून शाळांना पुरविलेल्या वॉटर क्युरिफायरमध्ये ५० लाख रुपये आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा आरोप सेनेचे गटनेते नागेंद्र परब यानी आरोप केल्याने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाला. सत्ताधारी भाजपने याला जोरदार आक्षेप घेत प्रत्येक वेळी भ्रष्टाचाराचा आरोप करून जिल्हा…

Read Full News

भाजपा मुंबई महानगरपालिका निवडणुक कोअर कमिटीवर आम.नितेश राणे

*💫कणकवली दि.१४-:* मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई प्रदेशने गठीत केलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुक कोअर कमेटीवर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. आज या कमिटीची मुंबईत बैठक झाली.आमदार नितेश राणे यांचे संघटनात्मक काम सर्वांनाच ज्ञात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या कामाची अनुभुती विरोधी पक्षाला चांगलीच आलेली आहे. या कमिटीत भाजपाच्या अनेक जेष्ठ नेत्यांचा समावेश…

Read Full News

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

पालकमंत्री उदय सामंत *💫ओरोस दि.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोवीडचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक असलेल्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रासह अकरा आरोग्य उपकेंद्रांना शासनाने नव्याने मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कोविड बाबत उपाय…

Read Full News

संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असलदे वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू वाटप

*💫कणकवली दि.१४-:* कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित, दिवीजा वृद्धाश्रमास शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले त्याचप्रमाणे वृद्धाश्रमात शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. मधुरा पालव यांनी व इतरांनी आपुलकीचा सुसंवाद साधला. यावेळी नगरसेविका माजी सौ. समृद्धी संदेश पारकर, सौ. शीतल सावंत, सौ….

Read Full News

जिल्ह्यात 15 ते 18 जुलै तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी;निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिनांक 14 जुलै रोजी तूरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून दिनांक 15 ते 18 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे वरील कालावधीत…

Read Full News

मांगवली येथे चारसूत्री व एसआरआय पद्धतीने भात लावणीचे प्रात्यक्षिक

*💫वैभववाडी दि.१४-:* मांगवली येथील प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांच्या शेतात चारसूत्री व एसआरआय पद्धतीने भात लावणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी शेतकरी महेश संसारे, सतीश जागुष्टे, कृषी पर्यवेक्षक एम. के. शिंदे, कृषी सहाय्यक स्नेहा घोडाम व महिला शेतकरी उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने भात लावणीवर ठाम आहेत. शेतीत देखील स्पर्धा आहे. त्यामुळे…

Read Full News

वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले

निशाण तलाव भरून वाहू लागले;नद्या, नाले तुडूंब *💫वेंगुर्ले दि.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. परिणामी येथील सकल भागात पाणी साचले असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. विशेष म्हणजे वेंगुर्ले शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या निशाण तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन तलाव भरून…

Read Full News

You cannot copy content of this page