मांगवली येथे चारसूत्री व एसआरआय पद्धतीने भात लावणीचे प्रात्यक्षिक

*💫वैभववाडी दि.१४-:* मांगवली येथील प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांच्या शेतात चारसूत्री व एसआरआय पद्धतीने भात लावणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी शेतकरी महेश संसारे, सतीश जागुष्टे, कृषी पर्यवेक्षक एम. के. शिंदे, कृषी सहाय्यक स्नेहा घोडाम व महिला शेतकरी उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने भात लावणीवर ठाम आहेत. शेतीत देखील स्पर्धा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीच्या शेतीची कास धरली पाहिजे. नवीन भात लावणीचे प्रकार व त्याचे फायदे कृषी अधिकाऱ्यांकडून आत्मसात केले पाहिजे. यावेळी शिंदे म्हणाले, कमी खर्च, वेळेची बचत व जास्त उत्पादन हे चार सुत्री पद्धतीचे फायदे आहेत. शासनाच्या नवनवीन योजना यांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी भात व नाचणी पीकाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. नवीन भात लागवडीचे प्रकार शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाहिजेत.

You cannot copy content of this page