*💫कणकवली दि.१४-:* कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित, दिवीजा वृद्धाश्रमास शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले त्याचप्रमाणे वृद्धाश्रमात शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. मधुरा पालव यांनी व इतरांनी आपुलकीचा सुसंवाद साधला. यावेळी नगरसेविका माजी सौ. समृद्धी संदेश पारकर, सौ. शीतल सावंत, सौ. माधुरी कोदे,माजी नगरसेविका तथा शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. मधुरा पालव, उपतालुका प्रमुख आबू मेस्त्री, नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर, असलदे शाखा प्रमुख सुरेश मेस्त्री व अन्य उपस्थित होते.
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असलदे वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू वाटप
