*💫कणकवली दि.१४-:* मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई प्रदेशने गठीत केलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुक कोअर कमेटीवर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. आज या कमिटीची मुंबईत बैठक झाली.आमदार नितेश राणे यांचे संघटनात्मक काम सर्वांनाच ज्ञात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या कामाची अनुभुती विरोधी पक्षाला चांगलीच आलेली आहे. या कमिटीत भाजपाच्या अनेक जेष्ठ नेत्यांचा समावेश असून मुंबई भाजपा प्रेदश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा,विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजीमंत्री, आमदार आशिष शेलार,खासदार गोपाळ शेट्टी,खासदार पूनम महाजन,आम.अतुल भातखळकर,आम.सुनील राणे,आम.अमित साटम,आम.प्रसाद लाड,मनोज कोटक,प्रवक्ते संजय उपाध्याय,आदी नेत्यांचा या कमेटीत समावेश आहे. शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षच्या आघाडीवर विजय मिळविण्यासाठी या कोअर कमिटीच्या नेत्यांचा अनुभव महत्वपूर्ण ठरणार आहे.
भाजपा मुंबई महानगरपालिका निवडणुक कोअर कमिटीवर आम.नितेश राणे
