Headlines

Global Maharashtra Breaking News

मसुरे येथील मान्यवरांचा मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या वतीने गौरव…

⚡मालवण ता.२९-:मसुरे एज्युकेशन सोसायटी ही संस्था गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तम असे काम करत आहे. मसुरे गावामध्ये शिक्षण क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रातही उल्लेखनीय काम करणाऱ्या गावातील ग्रामस्थांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारणारी ही एकमेव शिक्षण संस्था असून या संस्थेचा आम्हा सर्वांना गर्व आहे. यापुढे सुद्धा आपण सर्वांनी एकत्र येऊन ही संस्था अजून नावारूपास येण्यासाठी प्रयत्न…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्पाईन सर्जरीचा यशस्वी धडाका…

८ रुग्ण नवजीवनाकडे:उपजिल्हा रुग्णालय कणकवलीच्या सेवांचे कौतुक,अधिक रुग्णांनी लाभ घ्यावा;अशोक करंबेळकर.. ⚡कणकवली ता.२९-: येथील उपजिल्हा रुग्णालयात २७ व २८ मार्च रोजी पार पडलेल्या स्पाईन सर्जरी शिबिराने आरोग्य सेवेत नवा आदर्श निर्माण केला. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात एकूण ८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये ७ मेजर आणि १ मायनर शस्त्रक्रियेचा समावेश असून सर्व रुग्ण…

Read Full News

तळवणे नं. ०२ ची विद्यार्थिनी अंतरा मठकर जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम…

जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं. ०२ ची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अंतरा बापू मठकर हिने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे.अंतरा हिच्या या कर्तृत्वाचा गौरव म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते…

Read Full News

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये दिनांक 24 व 25 मार्च 2026 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, संचालक श्री. दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सावंत…

⚡कुडाळ ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष पदी वैभववाडी येथील संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुडाळ येथे झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृह येथे पार पडली. या सभेमध्ये तीन वर्षाकरिता नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून वैभववाडी…

Read Full News

जमिनीच्या वादातून ओवळीये येथे वृद्धेची कोयत्याने निर्घृण हत्या…

⚡सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील ओवळीये येथे जमिनीच्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्धेची कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज, रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. सरस्वती धोंडी सावंत असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओवळीये गावातील मधलीवाडीत जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू…

Read Full News

पी.एम. श्री शाळेला सभापती गणेश राणे यांची प्रेरणादायी भेट…

जामसंडे केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन; शिक्षण परिषदेत उत्स्फूर्त सहभाग.. ⚡देवगड ता.२९-: देवगड पंचायत समितीचे सभापती श्री. गणेश राणे आणि उपसभापती श्री. अमोल लोके यांनी पी.एम. श्री शाळा जोशी विद्यामंदिर जामसंडे नं. १ ला प्रेरणादायी भेट दिली. या भेटीदरम्यान जामसंडे केंद्राची शिक्षण परिषद सुरू असताना केंद्रातील सर्व शिक्षकांशी त्यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले.या वेळी जामसंडे केंद्राचे केंद्रप्रमुख…

Read Full News

बंद बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; लाखो रुपयांचा ऐवज लंपास…

⚡वैभववाडी ता.२९-: नाधवडे येथील परशुराम इस्वलकर यांचा बंद असलेला बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडून फ्रिज, इन्व्हर्टर, गॅस सिलेंडर तसेच इतर घरगुती साहित्याची मोठ्या प्रमाणात चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी इस्वलकर यांच्या निदर्शनास आली असून याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.नाधवडे शिडवणे रोडलगत परशुराम इस्वलकर यांनी नवीन बंगला बांधला…

Read Full News

सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीए शैलेश मुंडये…

⚡कुडाळ ता.२९-: सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीए शैलेश मुंडये यांची तर सचिव पदी सीए युगांत चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) रविवारी हॉटेल स्पाईस कोकण, कुडाळ येथे यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सीए शैलेश मुंडये,सचिव पदी सीए युगांत चव्हाण, जीएसटीपी,…

Read Full News

कोलझर येथील निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि माऊली ग्रामविकास कला क्रीडा मंडळाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२९-:सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि श्रीदेवी माऊली ग्रामविकास कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोलझर गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकिय शिबिरात कोलझर गावातील सुमारे १०० गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांना…

Read Full News

You cannot copy content of this page