Headlines

Global Maharashtra Breaking News

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव…

राज्य शासनाचे विशेष अभियान:जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींना सहभागाचे अध्यक्ष कामत यांचे आवाहन ⚡ओरोस ता ३०-: प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हे अभियान १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात…

Read Full News

शिंदे सेनेला धक्का, बाळा गावडे यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…

⚡सावंतवाडी ता.३० -:सावंतवाडी तालुक्यातील शिंदे शिवसेनेला धक्का बसला आहे. बाळा गावडे यांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून राजकीयदृष्ट्या शांत असलेले गावडे आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान बाळा गावडे यांच्या या पुनरागमनामुळे स्थानिक शिवसेनेला बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, पक्षाच्या…

Read Full News

सावंतवाडी येथील देव पिंपळ मारुती मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रमास आजपासून सुरुवात…

⚡सावंतवाडी ता.३०-: उभा बाजार येथील श्री देव पिंपळ मारुती मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या चार दिवसीय कार्यक्रमात अभिषेक, महापूजा, भजन, कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.आज सोमवार, दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महिला भजन मंडळाचे भजन तर…

Read Full News

सावंतवाडीत सक्शन व्हॅनचा उत्साहात शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.३०-: स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत अडीच हजार लीटर क्षमतेची सक्शन व्हॅन नगरपरिषदेस प्राप्त झाली असून याचा शुभारंभ आज करण्यात आला. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले. शहराच्या स्वच्छतेसाठी हे वाहन महत्वपूर्ण भुमिका बजावणार असून प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते पुरोहितांच्या…

Read Full News

कोणाचे तरी पैसे घेऊन मोर्चा काढणाऱ्यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करू नये…

संजू परब यांचा उबाठा सेनेला टोला:केसरकरांवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःचं तोंड आरशात पाहावे.. सावंतवाडी ता.३०-:कोणाचे तरी पैसे घेऊन मोर्चा काढणाऱ्यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करू नये, टीका करण्याआधी त्यांनी आपलं तोंड आरशात पाहावं, असा जोरदार टोला शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी लगावला. तसेच सिंधुदुर्गातील शिंदे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते केसरकर यांच्या पाठीशी…

Read Full News

कोकणच्या निसर्गाशी एकरूप झालेल्या कवितेच प्रतिबिंब “बकुळीची फुले” काव्यसंग्रहात ..

⚡सावंतवाडी ता.३०- : कविता लिहिणं ही वाटतं तेवढी सोप्पी गोष्ट नाही. शब्दांना आपल्या मुठीत पकडण्याचं काम कवी करतो. सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याच प्रतिबिंब ‘बकुळीची फुले’ या काव्यसंग्रहात दिसून येते‌. आजच्या छंदमुक्त कवितेच्या वातावरणात वृत्तबद्ध काव्य लिहिणाऱ्या कवी दीपक पटेकर यांचा गौरव करायला हवा, असे गौरवोद्गार माजी प्राचार्य एच. व्ही. देशपांडे…

Read Full News

कणकवलीत धावत्या कारने घेतला पेट…

⚡कणकवली ता.३०-: शहरातील नरडवे मार्गावर बांधकरवाडी बस थांब्यानजीक सोमवारी सकाळी सुमारे ९:२० वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. कणकवलीहून कनेडीच्या दिशेने जात असलेली इस्टिलो झेन कार अचानक पेट घेऊन काही क्षणांतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित कारमध्ये आउटफिटेड सीएनजी बसविण्यात आले होते. त्यामुळेच गाडीने अचानक पेट घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे….

Read Full News

वाळू उपशाविरोधात तळाशीलचे ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम…

⚡मालवण ता.२९-:मालवण तालुक्यातील कालावल खाडीमधील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशावर कारवाई न झाल्यास खाडी पात्रात उतरून आंदोलन करण्याचा इशारा तळाशील ग्रामस्थांनी दिल्यावर महसूल विभागाने वाळू उपशावरील कारवाईसाठी तीन पथके नेमून कारवाईचां इशारा दिल्याने वाळू उपसा बंद असला तरी खाडी पात्रात उभ्या करून ठेवलेल्या वाळू काढण्याच्या नौका वं इतर साहित्य जोपर्यंत…

Read Full News

देवबाग येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन..

⚡मालवण ता.२९-:देवबाग येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा ८१ वा वर्धापनदिन गुरुवार दि. ९ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पहाटे श्रींच्या मूर्तीवर अभिषेक व नित्यपूजा होणार असून दिवसभर भाविकांसाठी देवदर्शन खुले राहील. दुपारी ३.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजेस प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजता श्रींच्या प्रतिमांची मंदिराभोवती…

Read Full News

मसुरे येथे ‘सिंधू आरोग्य मेळावा’ उत्साहात संपन्न…

मालवण दि प्रतिनिधीआरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा आजचा हा सिंधू आरोग्य मेळावा अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून अशा आरोग्य मेळाव्यातून खऱ्या अर्थाने रुग्णांची सेवा होते. असे आरोग्य मेळावे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत झाल्यास शासनाचा आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल. ग्रामस्थांनी आणि रुग्णांनी सुद्धा अशा मेळाव्यांचा लाभ घेऊन…

Read Full News

You cannot copy content of this page