⚡सावंतवाडी ता.३० -:
सावंतवाडी तालुक्यातील शिंदे शिवसेनेला धक्का बसला आहे. बाळा गावडे यांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून राजकीयदृष्ट्या शांत असलेले गावडे आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दरम्यान बाळा गावडे यांच्या या पुनरागमनामुळे स्थानिक शिवसेनेला बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पक्षाच्या वरिष्ठांकडून बाळा गावडे यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. यामुळे आगामी काळात ते संघटनात्मक पातळीवर सक्रिय भूमिका बजावणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
