सावंतवाडी येथील देव पिंपळ मारुती मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रमास आजपासून सुरुवात…

⚡सावंतवाडी ता.३०-: उभा बाजार येथील श्री देव पिंपळ मारुती मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या चार दिवसीय कार्यक्रमात अभिषेक, महापूजा, भजन, कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सोमवार, दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महिला भजन मंडळाचे भजन तर सायंकाळी ७ वाजता कु. अंकिता गावडे (कट्टा-मालवण) यांचे सुश्राव्य भजन होणार असून त्यानंतर महाआरती व तीर्थप्रसाद दिला जाणार आहे.
मंगळवार, दि. ३१ मार्च २०२६ (चैत्र शुक्ल चतुर्दशी) रोजी सकाळी ९ वाजता महागणपती पूजन व रुद्राभिषेक, महापूजा, आरती व तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता महिला भजन मंडळाचे भजन तर रात्री ७ वाजता श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, ओटवणे यांचे भजन होणार आहे.
बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्री मारुतीरायांची महापूजा व विधिवत चांदीची प्रभावळ अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता महिला भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ७ वाजता श्री रामेश्वर भजन मंडळ (कुडाळ) तर रात्री ९ वाजता श्री धावडेश्वर भजन मंडळ, वेंगुर्ला यांचे भजन होणार आहे.
गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ (चैत्र शुक्ल पौर्णिमा) रोजी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ६.३० वाजता ह.भ.प. सौ. वर्षाराणी अभ्यंकर (मालवण) यांचे कीर्तन, दुपारी २ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वाजता महिला भजन मंडळाचे भजन तर सायंकाळी ७ वाजता श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ, वडखोल (वेंगुर्ला) यांचे भजन होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन श्री देव विठ्ठल-रखुमाई मंदिर, सावंतवाडी येथे करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून श्रींचा कृपाशीर्वाद घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page