सावंतवाडीत सक्शन व्हॅनचा उत्साहात शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.३०-: स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत अडीच हजार लीटर क्षमतेची सक्शन व्हॅन नगरपरिषदेस प्राप्त झाली असून याचा शुभारंभ आज करण्यात आला. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले.

शहराच्या स्वच्छतेसाठी हे वाहन महत्वपूर्ण भुमिका बजावणार असून प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करून व श्रीफळ फोडून या व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, देवा टेमकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, निलम नाईक, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, प्रशासकीय अधिकारी प्राची पाटील, स्वच्छता निरिक्षक विनोद सावंत, अक्षय पंडीत,आदींसह नगरसेवक उपस्थित होते.

You cannot copy content of this page