कणकवलीत धावत्या कारने घेतला पेट…

⚡कणकवली ता.३०-: शहरातील नरडवे मार्गावर बांधकरवाडी बस थांब्यानजीक सोमवारी सकाळी सुमारे ९:२० वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. कणकवलीहून कनेडीच्या दिशेने जात असलेली इस्टिलो झेन कार अचानक पेट घेऊन काही क्षणांतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित कारमध्ये आउटफिटेड सीएनजी बसविण्यात आले होते. त्यामुळेच गाडीने अचानक पेट घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण वाहन जळून खाक झाले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

You cannot copy content of this page