Headlines

Global Maharashtra Breaking News

खारेपाटण येथे संरक्षक भिंत कोसळल्यामुळे केंद्रशाळेकडे जाणार रस्ता झाला बंद

*💫कणकवली दि.२०-:* गेले पाच दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने खारेपाटण पोलीस स्टेशन अगदी जवळ असलेल्या श्री देव रायरेश्वर मंदिराच्या समोरील संरक्षक भीत कोसळून पडल्यामुळे जि. प. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. खारेपाटण येथील प्राचीन रायरेश्वर मंदिराच्या परिसरात चिरेबंदी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती.परंतु मुसळधार पावसाने बांधकामाला तडे जाऊन संरक्षक…

Read Full News

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कार्यालय सिंधुदुर्गात सुरु करा

अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ओरोस-अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक विकासाच्यादृष्टीने जिल्ह्यात मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्याची मागणी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्हीक्टर फर्नाडिस व कार्याध्यक्ष लॉरेन्स मान्येकर यांनी केली आहे . या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी के . मंजूलक्ष्मी यांना  देण्यात आले .          निवेदनात पुढे म्हटले की ,…

Read Full News

बांदा-शिरोडा मार्गावर अपघाती खड्डे

मार्ग वाहतुकीस निर्धोक करा;रस्त्याच्या दुतर्फा झुडपे तर मध्यभागी खड्ड्यांचे साम्राज्य *💫बांदा दि.२०-:* बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा व शेर्ले भागातून प्रवास करणे धोकादायक बनत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने गेल्या आठ दिवसांत अनेक अपघात घडले. तर दुतर्फा वाढलेली झुडपे नेहमीच अपघातास निमंत्रण देत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत मार्ग…

Read Full News

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरुच्या दिशेने वाटचाल

१ कोटी ६८ लाख रक्कमेचे फर्निचर खरेदीस राज्य शासनाची मंजूरी *💫कणकवली दि.२०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १ कोटी ६८ लाख ४० हजार २५० इतक्या रक्कमेचे फर्नीचर खरेदी करण्यासाठी राज्यशासनाकडून प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात…

Read Full News

मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा सुरू झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नेत्यांचे मानले आभार *💫मालवण दि.२०-:* कोरोनाचे संकट, कर्मचाऱ्यांची वाणवा आणि तांत्रिक कारणांमुळे गेले वर्षभर रखडलेल्या मालवण ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवेचा शुभारंभ चार दिवसापूर्वी मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर आता ही सेवा मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात नियमित सुरू झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर झाली असून ग्रामीण रुग्णालयाला डायलिसिस सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल…

Read Full News

वैभववाडी येथे कवी गायक यांच्यावतीने प्रभाकर पोमेडकर व राहुल शिंगे यांना वाहिली श्रद्धांजली

*वैभववाडी दि.२०-:* सिंधु रत्न कला मंचच्यावतीने आंबेडकरी चळवळीत जेष्ठ कवी गायक प्रभाकर पोमेडकर ( पंचशीलनगर, खारेपाटण ) व राहुलकुमार शिंगे ( बुरबांवडे) यांना नुकतीच श्रध्दांजली वैभववाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभवाडी येथे वाहाण्यात आली. प्रभाकर पोमेडकर यांचे नुकतेच ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.सिंधु रत्नकलामंच स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. तसेच या…

Read Full News

मंदिरातील गुरव पुजाऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या

कोरोना महामारीत फ्रंटलाईनमध्ये समावेश करा;उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन *💫वैभववाडी दि.२०-:* मंदिरातील गुरव पुजाऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा. तसेच कोरोना महामारीत त्यांचा फ्रंट लाईनमध्ये समावेश करा. या मागणीचे निवेदन गुरव ज्ञाती बांधव समाज जिल्हाध्यक्ष संजय सावंत- गुरव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. सदर निवेदन त्यांनी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. राज्य सरकारने या…

Read Full News

तौक्ते वादळातील लाभार्थ्यांच्या यादीत नाव नसल्याने देवबाग मधील ग्रामस्थ संतापले

मालवण तहसीलदारांना निवेदनातून मांडली कैफियत *💫मालवण दि.२०-:* तौक्ते वादळात नुकसान झालेल्या घरांच्या पंचयाद्या करूनही भरपाई लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव नसल्याने देवबाग मधील महिला व ग्रामस्थांनी मालवण तहसीलदारांना निवेदन सादर करून याबाबत लक्ष वेधले. आम्हाला नुकसान भरपाई मिळणार की नाही असा सवाल निवेदनातून उपस्थित केला आहे. तहसीलदारांना निवेदन सादर करतेवेळी देवबाग येथील रमीता येरागी, अपर्णा धुरी,…

Read Full News

तौक्ते वादळात नुकसान झालेल्या मच्छीमारांना शासनाने न्याय द्यावा

मच्छीमारांनी मत्स्य विभागाकडे निवेदन देत वेधले लक्ष *💫मालवण दि.२०-:* तौक्ते वादळात नुकसान झालेले बरेच मच्छीमार नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहेत, त्यामुळे अशा मच्छीमारांना शासनाने न्याय द्यावा अशी मागणी मच्छीमारांनी मत्स्य विभागाकडे निवेदन सादर करून केली आहे. आचरा येथील पुणेश तोडणकर, तुकाराम तोडणकर, शंकर गोलतकर, भूषण आंबेरकर, आबा मुणगेकर, रियान मुजावर, नमिता कुमठेकर आणि सर्जेकोट…

Read Full News

लॉकडाऊन आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन दुकान मालकांवर दंडात्मक कारवाई

*💫मालवण दि.२०-:* मालवण बाजारपेठेतील चहा स्टॉल व हॉटेल सायंकाळी ४ नंतर सुरू असल्याचे आढळून आल्याने नगरपालिकेने दोन्ही दुकान मालकांवर प्रत्येकी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकप्रमुख गीतांजली नाईक, विजय रावले, बस्त्याव फर्नांडिस, अनिकेत चव्हाण, सुनील चव्हाण, राजा केरीपाळे, रुपेश हडकर यांच्या पथकाने केली. दुकानदारांकडून नियोजित वेळेनंतर…

Read Full News

You cannot copy content of this page