मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा सुरू झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नेत्यांचे मानले आभार

*💫मालवण दि.२०-:* कोरोनाचे संकट, कर्मचाऱ्यांची वाणवा आणि तांत्रिक कारणांमुळे गेले वर्षभर रखडलेल्या मालवण ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवेचा शुभारंभ चार दिवसापूर्वी मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर आता ही सेवा मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात नियमित सुरू झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर झाली असून ग्रामीण रुग्णालयाला डायलिसिस सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांचे मालवणचे नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगावकर यांनी आभार मानले आहेत. मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस सेवा सुरू व्हावी ही येथील नागरिक लोकप्रतिनिधी यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. रुग्णांच्या डायलिसीस सेवेस प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. ज्या रुग्णांना डायलिसीस आवश्यक आहे त्यांना या सेवेसाठी ओरस किवा मोठ्या शहराचे ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होत होता ,मात्र आता ग्रामीण रुग्णालयात मोफत स्वरूपात ही सेवा रुग्णांना मिळणार आहे असे पत्रकात नमूद करून नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे की, मालवण ग्रामीण रुग्णालयात ही सेवा उपलब्ध करणाऱ्या आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकांनी उदय सामंत, तसेच तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मालवण शहराच्या वतीने आभार मानले आहेत

You cannot copy content of this page